Friday 25 September 2015

Nutshell


शब्द-शिंपल्यात । जपले विचार
सांगितले सार । जीवनाचे..!

Wednesday 23 September 2015

Birth


जन्माचे पाऊल । सान तिच्यापुढे
प्रौढ ‘त्याच्या’कडे । निघालेले..!

Tuesday 22 September 2015

Childhood


बाल्यावस्था असे । प्रारंभ चुकांचा
पाया आयुष्याचा । घडे तेव्हा..!

Monday 21 September 2015

Youth



तारुण्य सक्षम | उधळता येते
जतनही होते | भल्यासाठी..!




Sunday 20 September 2015

Middle age


माध्यान्ह विसावा । नवी सुरुवात
असे नेणीवेत । शहाणीव..!


Saturday 19 September 2015

Old age


पानगळ देई । स्मरण यात्रेचे
आता विरायचे । अनंतात..!