Saturday 31 October 2015

Sleep


झोप- छोटा मृत्यु, | स्वरूपा भेटणे
आणि परतणे । नव्या जन्मी..!

Friday 30 October 2015

Thinking


विचारांच्या सीमा । विचारां कळती
परतून होती । ध्यानमग्न..!

Thursday 29 October 2015

Knowledge


असो मनाआड । भोवतीचे रान
आतले सामान । आवरावे..!

Wednesday 28 October 2015

philosophy


सार्‍यांची उत्तरे । तत्त्वज्ञानापाशी
परंतू हाताशी । प्रतिबिंब..!

Tuesday 27 October 2015

Jungles


गर्द वनराई । चैतन्याचा स्रोत
औषधांची साथ । नसताना..

Monday 26 October 2015

Mountains


पर्वत पठारे । मोफत निवास
कोणाला धाडस । राहण्याचे?

Saturday 24 October 2015

Absolute


नित्य पूर्ण एक । अखंड निर्गुण
आपण सगुण । अंश त्याचे..!

Thursday 22 October 2015

Space


आकाश-पोकळी । एकच उपमा
ईश्वराच्या धामा । समर्पक..!

Wednesday 21 October 2015

Wind


ईश्वरधाकाने । वायु, सूर्य भ्रमे
आपण का कर्मे । टाळावीत..?

Tuesday 20 October 2015

Light


निबिड तमात । दिसता प्रकाश
यशाचे आकाश । येई हाती..!

Water


जलाशयापाशी । ध्यानाला बसावे
शल्य निरवावे । नादब्रह्मी..!



Saturday 17 October 2015

Earth


आदितत्त्व जरी । असे शून्याकार
पृथ्वीला आधार । अवकाश..!

Friday 16 October 2015

Insects


जगावेसे काही । नाही जीवनात
सार सांगतात । कीटक हे..!



Thursday 15 October 2015

Germs


जीवसृष्टीतील । कीटक किटाणू
अणू परमाणू । चेतनाचे..!


Wednesday 14 October 2015

Man, the miraculous seed


माणसाचे बीज । विस्मयकारक
उपजते एक । नवी व्यक्ती..!  

Tuesday 13 October 2015

Reptiles



वारुळांचे घर । पवन प्राशिती
उडण्याची गती । नाही त्यांना..!

Monday 12 October 2015

Birds


आकाश केवळ । वाट उड्डाणाची
सोय जगण्याची । धरेवर..!

Sunday 11 October 2015

Beasts


माणसापरास । म्हणे प्राणी बरे
साहतात सारे । सहजीच..!


Saturday 10 October 2015

Creations


विश्व साकारले । संकल्पामधून
तरंग होऊन । खेळणारे..!

Friday 9 October 2015

Creator


कसा हा निर्माता । उधळतो मुक्त
स्वयंभू, अलिप्त । असूनही..!


Thursday 8 October 2015

Man is model of God


जीवसृष्टीमध्ये । प्रजाती अनेक
माणूस प्रतिक । ईश्वराचे..!

Life is a lantern


ऐल पैल तम । असीम अनंत
मधे चंद्रज्योत । आयुष्याची..!

Tuesday 6 October 2015

Rebirth


महाभूते देती । देह मुक्त जीवा
नवा जन्म, नवा । कारावास..!



Monday 5 October 2015

Between death and rebirth


मृत्यू ते जन्म हा । कामना-प्रवास
चालला सायास । देहासाठी..! 

Sunday 4 October 2015

Death


रिता रंगमंच । वाट पाहतोय
प्राण तिष्ठतोय । विंगेमध्ये..!