Tuesday 15 December 2015

Liberation


मुक्तीच्या पायर्‍या । समोर दिसती
‘शब्दां’ची प्रचिती । येई जेव्हा..!

Monday 14 December 2015

God guided world..


ईश-दिग्दर्शित । आखिव विश्वाला
परीक्षक भला । कोण हवा?

Sunday 13 December 2015

Subsistence


निर्वाहाची हमी । म्हणे देव घेतो
चोचीसवे देतो । दाणे सुद्धा..!



Saturday 12 December 2015

Without prompter...


बोलवित्याविना । सारे खोळांबेल
जागीच थांबेल । विश्वनाट्य..!

Wednesday 9 December 2015

The perennial joy


दार वाजवाया । घाबरेल दुःख
तेव्हा नित्य सूख । प्रवेशेल..!



Tuesday 8 December 2015

Until you merge..


‘मी’पण विरता । अंतर सरेल
केवळ उरेल । असणेच..! 

Sunday 6 December 2015

Sky is blue-


आभासी नीलिमा । दिसे आकाशात
जसे शरीरात । वसे मन..!


Saturday 5 December 2015

This active Universe


चराचर विश्व । नित्य नवा खेळ
संकल्प केवळ । ईश्वराचा..!

Friday 4 December 2015

Moon


व्दितीयेची कोर । पूर्ण चंद्र होते
तेव्हाच दिसते । मोहक ती..!



Thursday 3 December 2015

Sun is visible God..


दिसणारा देव । एकमेव सूर्य
पण कोणा धैर्य । पाहण्याचे?..! 

On Foot if you go..


आतून निरिच्छ । त्यालाच लाभते
सारे जग घेते । डोक्यावर..!

Tuesday 1 December 2015

Breath


कुणीतरी आत । नित्य श्वास घेते
श्रेय त्याला जाते । उड्डाणांचे..!



Monday 30 November 2015

Individual


नाद गंध रूप । असो कोणतेही
ईश्वराची सही । सर्वावर..!

Sunday 29 November 2015

Duality



पार्थिवात बद्ध । पार्थिव दृष्टिला
व्दैताचीच लीला । दिसणार..!

Saturday 28 November 2015

Religions


विवेक-तरुंची । मुळे जरी भिन्न
एकच उद्यान । सर्वांसाठी..!

Friday 27 November 2015

Clothing


नसे आवरण । अंतर्बाह्य मुक्त
आपण विमुक्त । का न व्हावे?

Food is scarce


प्रत्येकाला जर । हाव अनावर
दुष्काळाचा भार । पडणार..! 

Wednesday 25 November 2015

Loneliness


कोलाहलमुक्त । एकांताच्या घरी
बोलावया हरी । अवतरे..!

Tuesday 24 November 2015

High concentration


भान हरपेल । अशी एकाग्रता
मनाला पेलता । येत नाही..!



Monday 23 November 2015

Craving for one thing..


अखंड ध्यासाला । वाट सापडते
यश सवे येते । चालताना..!

Sunday 22 November 2015

Inner voice


आतला आवाज । हाच खरा मित्र
असतो सर्वत्र । सोबतीला..!

Saturday 21 November 2015

Experience


जगताना रोज । धडे मिळतात
शिक्षक होतात । अनुभव..!


Friday 20 November 2015

Anxiety


रिकाम्या मानाला ।  चिंता पोखरते
विस्कटून जाते । पाहणेच..!



Thursday 19 November 2015

Grief


पार्थिव आनंद । क्षणात विरतो
दुःख पांघरतो । दीर्घकाल..!

Wednesday 18 November 2015

Book of Life


वरती आनंद । आत सारे दुःख
असे हे पुस्तक । जीवनाचे..!



Tuesday 17 November 2015

Indebted we are born..


जन्मजात ऋणी । असतो आपण
तसेच मरण । ठरलेले..!

Monday 16 November 2015

Morality


आदर्श झरती । सुमनांसारखे
फांदिलाच धोके । असतात..!

Sunday 15 November 2015

Evening


दिवस-रात्रीच्या । मध्यसीमेवर
सांध्य-हुरहुर । प्रस्थानाची..!



Saturday 14 November 2015

Sun


सूर्य ढाळी अश्रू । सावली पाहून
माध्यान्हीचे ऊन । झाकोळले..!



Friday 13 November 2015

Son


मृत्यु येण्यापूर्वी । बीज उगवते
फिरत राहाते । जीव-चक्र..!  

Thursday 12 November 2015

When you reach Moon..


पोचा चंद्रावर । दुसरा दिसेल
दुरून हसेल । मिष्किलसा..!


Tuesday 10 November 2015

Time


काळ एक मिती । अनादी अनंत
तरी मोजतात । दिस-मास..!



Monday 9 November 2015

Penance


आत्मक्लेष एक । अटळ वेदना
तीच की साधना । कोणासाठी..!

Sunday 8 November 2015

Knock the door..


वाजवून पाहा । उघडेल दार
दिरंगाई फार । होऊ नये..!
पुन्हा वाजवाया । असेल नसेल
क्षीण नि मृदुल । जीवन हे..!

Saturday 7 November 2015

Path of Devotion


भक्तीमार्ग सदा । खुलाच असतो
भक्त देव होतो । पोचे तेव्हा..!



Friday 6 November 2015

Real world


सत्यरूप विश्व । दृष्टिच्या पल्याड
पाहणे अल्याड । घोटाळते..!

Wednesday 4 November 2015

Dependence


आधाराशिवाय । कसे उमगेल
स्वतंत्र्याचे मोल । सामर्थ्याला..!



Tuesday 3 November 2015

Forbearance


मागणे न काही । फुलायचे फक्त
असायचे मुक्त । अंतर्बाह्य..!

Monday 2 November 2015

Super conscious..


आत्मलीन स्थिती । पाहते स्वरूप
जणू विश्वरूप । पाहतेय..!

Sunday 1 November 2015

God is in action


कर्मयोग ‘त्याचा’ । अखंड चालला
सजग मनाला । आकळतो..!



Saturday 31 October 2015

Sleep


झोप- छोटा मृत्यु, | स्वरूपा भेटणे
आणि परतणे । नव्या जन्मी..!

Friday 30 October 2015

Thinking


विचारांच्या सीमा । विचारां कळती
परतून होती । ध्यानमग्न..!

Thursday 29 October 2015

Knowledge


असो मनाआड । भोवतीचे रान
आतले सामान । आवरावे..!

Wednesday 28 October 2015

philosophy


सार्‍यांची उत्तरे । तत्त्वज्ञानापाशी
परंतू हाताशी । प्रतिबिंब..!

Tuesday 27 October 2015

Jungles


गर्द वनराई । चैतन्याचा स्रोत
औषधांची साथ । नसताना..

Monday 26 October 2015

Mountains


पर्वत पठारे । मोफत निवास
कोणाला धाडस । राहण्याचे?

Saturday 24 October 2015

Absolute


नित्य पूर्ण एक । अखंड निर्गुण
आपण सगुण । अंश त्याचे..!

Thursday 22 October 2015

Space


आकाश-पोकळी । एकच उपमा
ईश्वराच्या धामा । समर्पक..!

Wednesday 21 October 2015

Wind


ईश्वरधाकाने । वायु, सूर्य भ्रमे
आपण का कर्मे । टाळावीत..?

Tuesday 20 October 2015

Light


निबिड तमात । दिसता प्रकाश
यशाचे आकाश । येई हाती..!